स.पो.नि. सचिन बागुल यांच्यासह चौघे निलंबीत?

On: July 27, 2022 8:10 AM

नगर : सोनई पोलिस पोलिस स्टेशनचे स.पो.नि. सचिन बागुल, पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे, एएसआय संजय चव्हाण, पो.कॉ. अनिल जाधव अशा चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. सोनई येथील तरुणास पोलिस स्टेशनमधे मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सदर निलंबन कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

नगर येथील गणेशवाडी परिसरातील राजेंद्र रायभान मोहिते या तरुणास समज देण्याच्या नावाखाली सोनई पोलिस स्टेशनला बोलावून मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात संबंधीत अधिका-यांसह चौघांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment