दोन हजाराची लाच हातात, शिपाई एसीबीच्या ताब्यात

On: July 27, 2022 4:00 PM

जळगाव : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्विकारणा-या तहसील कार्यालयातील शिपायाला एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. मगन गोबा भोई रा. वाघ नगर जळगाव असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. या कारवाईने महसुल प्रशासनात खळबळ माजली आहे.

या घटनेतील तक्रारदार महिला घटस्फोटीत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे फार्म स्वीकारणे व इतर कामे या शिपायाकडे आहे. 27 जुलै रोजी या कामाच्या संदर्भात तक्रारदार महिला मगन भोई या शिपायाकडे आली होती. या कामाच्या बदल्यात मगन भोई याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान सापळा रचून दोन हजार रुपयांची लाच घेतांना एसीबी पथकाने शिपाई मगन भोई यास रंगेहाथ पकडले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment