पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी नायब तहसीलदाराविरुद्ध गुन्हा

On: July 28, 2022 8:12 AM

धुळे : धुळे शहरातील शिवनेरी कॉलनी देवपूर परिसरात नायब तहसीलदार गोपाल साहेबराव पाटील राहतात. त्यांची पत्नी चित्रलेखा गोपाल पाटील (36) यांनी बुधवारी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले. या घटनेप्रकरणी मयत चित्रलेखा यांचे वडील लोटन पांडुरंग थोरात (रा.विटाभट्टी देवपूर धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार गोपाल पाटील यांच्या पत्नीची आत्महत्या आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने महसुल विभागात खळबळ माजली आहे.

गोपाल पाटील सध्या साक्री येथे ते कार्यरत आहेत. या घटनेनंतर चित्रलेखा पाटील यांचा मृतदेह हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. मयत चित्रलेखा यांचा सासरी छ्ळ सुरु होता. पतीकडून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता व त्यातून वाद देखील झाला होता अशा स्वरुपाचे आरोप त्यांचे वडील लोटन थोरात यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केले आहेत. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment