जळगाव : गुरांची चोरी करणा-या टोळीला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शेख इम्रान शेख ईसा, शेख ईब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान, शेख उमेर शेख ताहीर, सर्फराज बिलाल खाटीक, शेख सत्तार शेख ईसा, शेख इरफान शेख ईसा (सर्व रा.आबदलशा नगर, इदगाह,सिल्लोड, जि.औरगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील खेर्डे, वाघळी शिवार, वडाळी वडाळी, न्हावे, जावळे, रोकडे फाटा, पिंपळवाड निकुंभ आदी गावातून एकुण 20 गुरे चोरुन नेल्याचे या टोळीच्या माध्यमातून उघडकीस आले आहेत. याशिवाय सोनगाव पोस्ट खेर्डे येथील ममराज जाधव यांनी 13 जुलै रोजी दाखल केलेला गुरे चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. अटकेतील गुन्हेगारांकडून आठ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप व्हॅन असा 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिक चौकशीअंती चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील नागद, पिलखोड, हनुमंतखेडा व परिसरातील गुरे चोरी केल्याचे देखील अटकेतील आरोपींनी कबुल केले आहे. चोरी केलेल्या गुरांची विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव येथे लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून मुख्य सुत्रधांरांचा शोध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे व त्यांचे सहकारी घेत आहेत. आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेगें यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, पोलिस उप निरीक्षक लोकेश पवार, स.फौ. राजेद्र सांळुखे, सफौ. अविनाश पाटील, पोहेकॉ नितीन श्रीराम सोनवणे, दत्तात्रय महाजन, कैलास पाटील, दिपक ठाकुर, पोना नितीन किसन आमोदकर, शांताराम सिताराम पवार, गोवर्धन राजेंद्र बोरसे, संदिप ईश्वर पाटील, भुपेश वंजारी, संदिप माने, ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, देविदास संतोष पाटील, दिनेश विक्रम पाटील, प्रेमसिंग नरसिंग राठोड, विजय पाटील, संदिप पाटील, हिराजी देशमुख, नंदकुमार जगताप, मपोना मालती बच्छाव व चालक सफौ अनिल आगोणे, पोना मनोहर पाटील आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस नाईक नितीन आमोदकर, पोलिस नाईक गोवर्धन बोरसे, पोलिस नाईक संदीप पाटील असे खासगी वाहनाने सिल्लोड येथे जात असतांना वाटेत त्यांच्या वाहनाला अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन पुर्णपणे चेपले गेले. वाहनातील पोलिस पथकाला मुक्कामार लागला असून सुदैवाने सर्वजण बचावले. मात्र तरीदेखील सिल्लोड येथे जावून त्यांनी आरोपीस ताब्यात घेत अटक केली. याकामी महिला पोलिस नाईक मालती बच्छाव यांची कामगिरी मोलाची ठरली.