घर बंद असल्याची संधी साधत 40 हजाराचा मुद्देमाल लंपास

जळगाव : सध्या चोरी व घरफोडीच्या घटनांनी जळगाव शहरासह जिल्ह्यात थैमान घातल्याचे दिसून येत आहे. घर बंद असल्याची संधी साधून चोरटे आपली करामत दाखवत असल्याचे विविध घटनांमधून सध्या दिसत आहे. दररोज विविध पोलिस स्टेशनला चोरी व घरफोडीचे कमी अधिक गुन्हे दररोज दाखल होत आहेत.

सुन व मुलगा घरी नसल्यामुळे शेजारी राहणा-या पुतण्याच्या घरी गेलेल्या महिलेच्या घरातून चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना जळगाव शहरातील मास्टर कॉलनी भागात उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दीन या महिलेचे मास्टर कॉलनी भागात तिन मजली घर आहे. या महिलेचा मुलगा व सुन परगावी गेले होते. त्यामुळे मेहरुन्नीसा या शेजारी राहणा-या पुतण्याच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी 28 व 29 जुलैच्या दरम्यान रात्रीच्या वेळी मागच्या दरवाज्याने प्रवेश करुन चोरीचा प्रकार केला. या घटनेत 20 हजार रुपये रोख व 20 हजार रुपये किमतीचे दागिने असा एकुण 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. सकाळी नमाज पठणासाठी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या गुन्ह्याची एमआयडीसी पोलिस स्टेशनला नोंद झाली असून हे.कॉ. रामकृष्ण पाटील पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here