माढा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणा-या पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे घडली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
माढ्यातील शुक्रवार पेठ परिसरात रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सना इरफान मोमीन ( 27) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती इरफान रजाक मोमीन याच्यासह सासरा आणि सासूवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी तिघांना अटक करण्यात आली. मयत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर पती इरफान याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली आहे.
मयत सना आणि इरफानचे यांचा काही वर्षापुवी विवाह झाला होता. त्यांना सहा वर्षांचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी आहे. पती इरफान हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असे. त्यातून तो तिला मारहाण करत असे. त्सेच माहेरुन काहीच आणले नाही या कारणावरुन देखील मारहाण करत असे. सनाच्या नावावर असलेला उस्मानाबादेतील प्लॉट आपल्या नावावर करुन देण्याचा तो तगादा लावत होता. या वादातून इरफान याने रागाच्या भरात सनाचा गळा आवळून खून केला.