अकोला रेल्वे स्टेशनवर 2 किलो सोने व 100 किलो चांदी हस्तगत

On: July 30, 2022 11:54 AM

अकोला : लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने अकोला रेल्वे स्टेशनवर मुंबई हावडा मेलमधून दोन किलो सोना आणि सुमारे १०० किलो चांदी हस्तगत केली आहे. आंगडीया कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून अकोला शहरात आलेले सोने व चांदी कुणाची आहे याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

अकोला रेल्वे स्टेशनवर ‘मुंबई हावडा मेल’ या रेल्वेत प्रवास करणाऱ्या शुभम नामक व्यक्ती जवळ जड बॅग आढळून आली. त्याची चौकशी केली असता त्याने बॅगेची तपासणी करण्यास नकार दिला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर सोने व चांदी आढळून आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment