दोघा तरुणांचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून

On: August 8, 2020 4:03 PM

पुणे : शिरोली (ता. खेड ) परिसरातील खापरदरा येथे दोघा तरुणांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करत खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे राजगुरुनगर (खेड) परिसरात  खळबळ माजली आहे.

शिरोली खापरदरा येथील हरणटेकडी येथे दोन अनोळखी तरुणांचे मृतदेह काटेरी झुडपात गुरे चारणा-या गुराख्यांच्या नजरेस पडले. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंपे, प्रभारी पोलिस निरिक्षक सतिश गुरव, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख व त्यांचे सहकारी कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई सुरु केली.

दोघा मयतांची ओळख पटली नसून त्यांचे अंदाजे वय तिस वर्ष असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळावर दारुचे ग्लास व गांजा पिण्याची चिलीम आढळून आली आहे. याचा अर्थ गुन्हा घडण्यापुर्वी येथे पार्टी झाली होती. त्यानंतर झालेल्या वादातून दोघा तरुणांचा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment