सकाळी सात वाजेपासून ईडीचे पथक संजय राऊत यांच्या बंगल्यावर

On: July 31, 2022 9:27 AM

आज 31 जुलैच्या सकाळी सात वाजेपासून ईडीचे पथक संजय राऊत यांच्या बंगल्यावर डेरेदाखल झाले आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी पथकाकडून आज दिवसभरात राऊत यांची नव्याने चौकशी होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच घराची झडती देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापुर्वी देखील संजय राऊत यांच्या अलिबाग येथील 8 प्लॉट आणि मुंबई येथील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून झाली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रविण राऊत यांना यापुर्वी चौकशीअंती अटक झाली होती. याच घोटाळ्यातील पैसा अलिबाग येथे मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरला असण्याची ईडीला संशय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment