महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा – संजय राऊतांनी फटकारले

On: July 31, 2022 7:07 PM

मुंबई : माझ्या विरुद्ध खोटे कागदपत्रं, खोटे पुरावे लोकांना मारपीट करुन तयार केले जात आहेत. महाराष्ट्राला, शिवसेनेला कमजोर करण्यासाठी हे करण्यात येत आहे. महाराष्ट्र कमजोर होणार नाही, शिवसेना कमजोर नाही, संजय राऊत झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, महाराष्ट्रावर हल्ले करण्यात येत आहेत, पेढे वाटा, बेशरम लोक आहात तुम्ही पेढे वाटा, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलतांना खा. संजय राऊत यांनी शिंदे गटात सामील झालेल्या संजय शिरसाठ यांना उद्देशून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हटले आहे.

शिवसेना खा. संजय राऊत यांच्याविरुद्ध आज सकाळपासून ईडीने कारवाईचे शस्त्र चालवले आहे. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत आज सकाळपासून ईडीच्या ताब्यात आहेत. पुढे बोलतांना खा. संजय राऊत यांनी म्हटले की हे सगळं दमनचक्र सुरु आहे. मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment