जळगाव : चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील पोलिस पाटील आज दुपारी एसीबी च्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली. या घटनेमुळे पोलिस पाटील या प्रतिमेला तडा गेली आहे.
तक्रारदाराच्या मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधानंतर वाद झाल्यानंतर पोलिस स्टेशनला कळवले तर गुन्हा दाखल होईल अशी भिती तक्रारदारास दाखवण्याचे काम विरवाडे येथील पोलिस पाटील महारु हरी कोळी यांनी केली. या बाबतची माहिती पोलिस स्टेशनला न देण्यासाठी तिन हजार रुपयांची लाच तक्रारदारास मागण्याचा प्रकार पोलिस पाटील महारु हरि कोळी यांनी केला.
याप्रकरणी तक्रारदाराने जळगाव एसीबी कडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज दुपारी सापळा रचून लाच स्विकारतांना पोलिस पाटील महारु हरी कोळी यांना अटक करण्यात आली.
तक्रारदाराच्या मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र नंतर त्यांच्यात वाद झाले. हा वादाचा प्रकार गावातच रहावा आणि पोलिस स्टेशनला गेल्यास गुन्हा दाखल होईल अशी भिती पोलिस पाटील यांनी घातली होती . ती भिती दाखवून लाच स्विकारणे महारु कोळी यांना महागात पडले.
पोलिस अधिक्षक सुनिल कडासने व अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक गोपाळ ठाकुर यांच्या सह त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.