जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलसचिव पदासाठी मुलाखतींचे सत्र 30 जुलै 2022 रोजी आटोपले असून विनोद प्रभाकर पाटील यांची नियुक्ती झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र कुलसचिव पदी नियुक्ती जाहीर झालेले विनोद पाटील यांच्या नियुक्तीवर जोरदार आक्षेप घेतला जात आहे.
विनोद प्रभाकर पाटील यांच्याविरुद्ध जळगाव न्यायालयात फौजदारी केस क्रमांक 610/2006 नुसार भा.द.वि. कलम 319 नुसार खटला दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या विषयासंदर्भात कपिल एन गिरी व जे.पी. शिरसाठ यांनी जळगाव चौथे सह दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. न्यायालयाने विनोद पाटील यांच्यावर आक्षेप घेत प्रथम दर्शनी दोषी ठरवत नोटीस काढण्याचा आदेश दिला आहे.
विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्याच्या विषयासंदर्भात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. राजकीय दबावापोटी विनोद पाटील यांची कुलसचिव पदी नियुक्ती जाहीर झाली असल्याचे म्हटले जात आहे. या नियुक्ती आदेशामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे देखील म्हटले जात आहे.