जळगाव : शहरातील नशेमन कॉलनी – मास्टर कॉलनी परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. 28 जुलै रोजी रात्री मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दीन या गृहिणी त्यांच्या घराला कुलूप लावून शेजारी राहणाऱ्या पुतण्याकडे गेल्या होत्या. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 20 हजार रुपये रोख आणि 20 हजार रुपयांचे दागिने असा एकुण 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी भेट देत तापासकामी सुचना दिल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली रा. शाहुवालीया मशीद जवळ, तांबापुरा, जळगाव, सलीम उर्फ सल्या शेख कय्युम, रा. बिस्मील्ला चौक, तांबापुरा, जळगाव व सरजील सैय्यद हरुन सैय्यद, रा. एकता हॉल जवळ, मास्टर कॉलनी, जळगाव यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, जमीर शेख, सचिन पाटील, साईनाथ मुंढे आदींनी तिघांना तांबापुरा व मास्टर कॉलनी परिसरातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्यांनी आपला गुन्हा केला. त्यांच्याकडून चोरी केलेली सोन्याची पोत हस्तगत करण्यात आली. उर्वरीत मुद्देमालाचा शोध सुरु आहे. ईश्तीयाक अली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी देखील चोरी, घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. सलीम उर्फ सल्या शेख याच्या विरुध्द चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. सरजिल विरुद्ध खुनाचा प्रयत्न व मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
अटकेतील तिघांना न्या. श्रीमती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता 8 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारतर्फे अँड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. या गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील व पोना सचिन पाटील करत आहेत.