चारचाकी वाहनाच्या धडकेत घोड्याचा मृत्यु – गुन्हा दाखल

On: August 5, 2022 3:36 PM

जळगाव : चारचाकी छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत घोड्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश जयवंत महाले उर्फ सोनल घोडेवाला (शिवशक्ती चौक तांबेपुरा अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या अपघाती मृत्यूप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

4 ऑगस्ट रोजी दुपारी तिन वाजेच्या सुमारास धार या गावाहून अमळनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणा-या छोटा हत्ती वाहनाने चुकीच्या बाजुने ओव्हरटेक करत असतांना पलीकडून येणा-या घोड्याला जोरदार धडक दिली. या धडकेत घोड्याच्या मृत्यू झाला. चार वर्ष वयाच्या घोड्याच्या मृत्यूप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. सुनिल हटकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment