बजाज फायनान्सकडून ग्राहकांची दिशाभूल?

बजाज फायनान्स बाबत ग्राहकांची सुरु असलेली ओरड
काल्पनिक चित्र

पारोळा : पारोळा शहर व परिसरातील बजाज फायनान्सच्या ग्राहकांना कॅशबॅकच्या काही स्किम जाहीर करण्यात आल्या होत्या असे ग्राहकांचे म्हणणे आहे. या स्किम जाहीर होवून जवळपास चार ते सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र अद्याप देखील बजाज फायनान्स कडून संबंधितांना कॅशबॅक मिळत नसल्याची ग्राहकांची ओरड सुरु असल्याचे समजते. या प्रकारामुळे पारोळा शहर व परिसरातील बजाज फायनान्सचे ग्राहक वैतागले आहेत.

या बाबत माहिती अशी की गेल्या जानेवारी महिन्यापासुन पारोळा शहरातील बजाज फायनान्स कंपनीतर्फे मोबाईल फोन, इलेक्ट्रीक व इतर साहित्यांवर विविध प्रकारच्या कॅशबॅक स्किम ग्राहकांना सादर करण्यात आल्या होत्या. त्या स्किम बघून कित्येक ग्राहकांनी त्यात सहभाग घेतला. दहा हजार रुपयाच्या वरील वस्तु अथवा मोबाईल घेतल्यास सहा हजार रुपयांचे कॅशबॅक देवू अशा स्वरुपाच्या त्या जाहिराती होत्या असे ग्राहकांचे म्हणणे आहे. अशा जाहिराती बजाज फायनान्स व दुकानदार करत होते.

या जाहिराती बघून अनेक ग्राहकांनी मोबाईल व इतर वस्तू विकत घेतल्या. मात्र अद्याप कुणालाही कॅशबॅक देण्यात आला नसल्याची ग्राहकांची ओरड सध्या सुरु आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी काही ग्राहकांनी बजाज फायनान्सचे कार्यालय गाठले. मात्र तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. आपली फसवणूक झाली असल्याची भावना ग्राहकांच्या मनात घर करुन आहे.

याशिवाय व्याजाची आकारणी देखील अवाजवी होत असल्याची काही ग्राहकांची ओरड आहे. ग्राहकांनी कर्जाचे पैसे भरण्यास उशीर  केला तर त्यांना दमबाजी करण्यात येत असल्याच्या तक्रारी सुरु असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here