जळगाव : अल्युमिनीयम वायर तयार करणा-या अटकेतील आरोपीच्या फरार साथीदारास अटक करण्यात आली आहे. दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता.
19 जुलै रोजी एमआयडीसी परिसरातील गिता इंडस्ट्रीज या अॅल्युमिनीयम वायर तयार करणा-या कंपनीतून 59 हजार रुपये किमतीचे वायरचे बंडल चोरी झाले होते. या दाखल गुन्ह्यातील संतोष मोहन चव्हाण (रा. पांडे किराणा समोर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यास अटक करण्यात आली होती. त्याचा साथीदार दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. त्याचा शोध सुरु होता. त्याला सुप्रिम कॉलनीतून अटक करण्यात आली. पो.नि.प्रताप शिकारे यांच्या पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, इम्रानअली सैय्यद, किशोर पाटील, सचिन पाटील, गोविंदा पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. न्या. जे. एस. केळकर यांनी त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षाच्या वतीने अॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.