वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या पुलगावलगत एका वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर दोन ते तिन दिवसांपुर्वी झालेल्या सामुहीक अत्याचाराची घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी दोघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुलगाव शहरापासून काही अंतरावरील एका वसाहतीत या पिडीत बालिकेचे कुटुंब राहते. या परिवाराशी संबंधीत तिघा जणांनी या बालिकेला तिन दिवसांपुर्वी उचलून जंगलात नेले.
त्याठिकाणी तिच्यावर तिघांनी सामुहिक अत्याचार केला. या वस्तीशी संबंधित देवळी येथील एका तरुणाने सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या घटनेची सत्यता बाहेर आली. त्या सामाजिक कार्यकर्त्याने वस्तीला भेट देवून पीडित परिवारासोबत चर्चा केल्यानंतर या घटनेची माहिती उघड झाली. भयभीत झालेले हे कुटूंब कुणाशी बोलण्यास तयार नव्हते. त्या सामाजिक कार्यकर्त्याच्य मदतीने या परिवाराने पुलगाव पोलिस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.