जळगाव : सप्तरंग इव्हेंट अॅंण्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजीत कार्यक्रमात जळगाव येथील समाजसेविका सौ. आशाताई सुधाकर अंभोरे यांचा नुकताच खान्देश भुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मराठी सिने अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे हा पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
सौ. आशाताई अंभोरे या लहुजी ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून काम बघत आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून द्यावे असे मत सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. त्यांच्या कार्याची दखल सप्तरंग इव्हेंट मॅनेजमेंंटने घेतल्यामुळे त्यांचे देखील आभार अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी यावेळी बोलतांना मानले. कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, अॅड. राजेश झाल्टे, पी. ई. तात्या पाटील, लहुजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुरेश अंभोरे आदींची उपस्थिती होती. सौ. आशाताई अंभोरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्काराने सन्मानित नामदेव मोरे यांच्यासह अशोक पारधे, लहुजी ब्रिगेडचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सैय्यद जमील भाई, छप्परबंद मुस्लीम शाह बिरादरीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अजमलशाह, महिला आघाडीच्या मालनताई तडवी, विमलताई मोरे आदींनी अभिनंदन केले आहे. सौ. आशाताई अंभोरे यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.