धुळे : धुळे पोलिस दलातून निलंबीत केलेल्या पोलिसाचा खून प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून येत असून तो फरार झाला आहे. कपील लिंगायत असे फरार व निलंबीत पोलिस कर्मचा-याचे नाव असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.
धुळे शहरात 5 ऑगस्ट रोजी चंदन पोपली या तरुणाची पिस्तुलातून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत निलंबीत पोलिस कर्मचारी कपील लिंगायत याने चंदन पोपली याला धरुन ठेवल्याने यासिन यास गोळी झाडण्याची संधी मिळाल्याचे समजते. पोलिसांचे गुन्हे शोध पथक कपील लिंगायत याच्या मागावर अअहे. या हत्येच्या वेळी वापरण्यात आलेले पिस्तुल अटकेतील यासिन याने काढून दिले आहे.
सट्टा व्यवसायातील साडेतीन हजारांच्या उधारीमुळे चंदन राजेंद्र पोपली (40) याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर भटू चौधरी व यासिन पठाण या दोघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. तिसरा संशयीत कपील लिंगायत फरार आहे. संशयित फरार कपिलचे गुन्हेगारांसोबत जवळचे संबंध असल्याबाबत वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार गेली होती. मध्यप्रदेश पोलिसांनी टाकलेल्या अवैध व्यवसायाच्या छाप्यात कपील यास ताब्यात घेण्यात आली होते. त्या कारवाई नंतर कपील यास निलंबीत करण्यात आले होते.