तरुणाचा आढळला मृतदेह – हत्येचा संशय

On: August 10, 2022 12:04 PM

जळगाव : आज पहाटे नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. संकेत आढाळे रा. भादली असे तरुणाचे नाव निष्पन्न झाले आहे.

घटनेची माहिती मिळतच नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. तरुणाच्या डोक्याला मार लागला असून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शव विच्छेदनकामी मृतदेह जळगाव सामान्य रग्णालयात रवाना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह सहायक फौजदार अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव व बाळू पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment