जबरी अत्याचारातून जन्माला आलेले बाळ टाकले नाल्यात

On: August 10, 2022 1:19 PM

जळगाव : झोपडीत राहणा-या महिलेवर मद्याच्या नशेत अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. या अत्याचारातून तिने बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर घाबरलेल्या पिडित महिलेने ते बाळ नाल्यात टाकून देण्याचा प्रकार केला.

चोपडा तालुक्यातील सनपुले या गावी घडलेल्या या घटने प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास गोकुळ पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. साधारण नऊ महिन्यापुर्वी कैलास पाटील या सनपुले येथील इसमाने आदिवासी समाजाच्या महिलेवर मद्याच्या नशेत अत्याचार केला. या अत्याचारातून तिला दिवस गेले. यातून तिने बाळाला जन्म दिल्याने बोभाटा होवू नये म्हणून घाबरुन तिने आपल्या पोटच्या बाळाला नाल्यात फेकून दिले. विविध कलमाखाली दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रावले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment