पळून जाण्याचा बेतात असलेल्या प्रेमी युगलाची हत्या

On: August 13, 2022 10:33 AM

जळगाव : आज पहाटे चोपडा शहरात प्रेमी युगलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. पिस्टलची गोळी झाडून तरुणाची तर गळा दाबून तरुणीची हत्या करण्यात आली आहे. वर्षा समाधान कोळी (20), रा. सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (22), रा. रामपूरा चोपडा अशी हत्या झालेल्या प्रेमी युगलांची नावे आहेत. हत्या करणारा तरुणीचा अल्पवयीन भाऊ हत्यारासह स्वतः चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल झाला. आपण दुहेरी हत्या केल्याची खळबळजनक माहिती त्यानेच पोलिसांना दिली.

चोपडा शहरालगत जुना वराड रस्त्यालगत घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असता दोघांचे मृतदेह आढळून आले. तरुणाची गोळी मारून तर तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तरुणीच्या अल्पवयीन भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिसात चौघांविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment