उत्तर प्रदेशात पुन्हा एक एन्काऊंटर

उत्तर प्रदेशातील बिजेपी चे आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येचा आरोपी व गँगस्टर राकेश पांडे उर्फ हनुमान पांडे याचे एन्काऊंटर करण्य़ात आले आहे. राकेश पांडे याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. मागील महिन्यात पोलिसांचे हत्याकांड करणाऱ्या गँगस्टर दुबे हा देखील पोलिसांच्या एन्कांऊटरमधे मारला गेला होता. राकेश पांडे हा मुख्तार अन्सारी आणि मुन्ना बजरंगीचा साथीदार होता.

लखनऊच्या सरोजिनीनगर परिसरात राकेशचे एन्काऊंटर करण्यात आले. मुन्ना बजरंगी याच्या खूनानंतर राकेश पांडे हा मुख्तार अन्सारीची टोळी ऑपरेट करत होता. अन्सारी गँगचा तो शूटर होता. राकेश पांडे याचा अनेक हत्यांमध्ये सहभाग होता. भाजपा आमदारासह मऊचा ठेकेदार अजय प्रकाश सिंह तसेच अजून एका दुहेरी हत्याकांडात राकेश पांडे याने मुख्य भुमिका बजावली होती. राकेश याच्यावर अनेक खूनाचे गुन्हे दाखल होते. लखनऊसह रायबरेली, गाझीपूर आणि मऊमध्ये त्याच्यावर जवळपास दहा गंभीर गुन्हे नोंद आहेत.

भाजपा आमदार कृष्णानंद यांच्या हत्येनंतर अन्सारीचे नाव पुढे आले होते. जवळपास अर्धा डझन गुंडांनी आमदार कृष्णानंद राय त्यांच्यासह त्यांच्या सहा साथीदारांची बंदुकीच्या गोळ्यांनी हत्या केली होती. या सात जणांच्या मृतदेहातून 67 बंदूकीच्या गोळ्या निघाल्या होत्या. या हत्याकांडातील साक्षीदार असलेले शशीकांत राय यांचा सन 2006 मधे रहस्यमय मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here