जळगाव : भारतावर ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरुध्द स्वातंत्र्य सैनिकांनी चळवळ, आंदोलनांच्या माध्यमातून प्रतिकार केला. वेगवेगळ्या ठिकाणांची स्वातंत्र्य सैनिकांची भुमिका ऐतिहासिक ठरली. त्याग, बलिदानातून भारताची शौर्य गाथा लिहली गेली. स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आले आहे. सर्वांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या दि. 15 आॕगस्टला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते दुपारी 2 वाजता होणार आहे.
भारतातील संस्कृती, भौगोलिक विविधेतुन समृद्ध नैसर्गिक संपदा, प्रेम सहिष्णुतेची शिकवण यामुळेच भारत म्हणजे सोन्याची खाण असे म्हटले जायचे. प्रदर्शनात पहिले पॕनेल हे ‘भारत सोने की चिडीया’ हे असेल. भारतात असलेले नैसर्गिक सौंदर्य, वास्तू, शिल्प यासह समृद्ध वारसा असलेली ऐतिहासिक स्थळे हा गौरवशाली इतिहास ते 1947 पर्यंत च्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण घटनांची माहिती तथ्यांच्या आधारावर तपासून छायाचित्रांसह जळगावकरांना महात्मा गांधी उद्यान येथे पाहता येणार आहे. या प्रदर्शनात भारतीय राष्ट्रध्वज, संविधान, स्वातंत्र्य संग्राम आणि संस्थांनाचे भारतात विलगीकरणातुन संयुक्त भारत अशी माहीत नागरिकांना समजेल.
भारतीय राष्ट्रध्वजाचा आरंभ कसा झाला त्याची निर्मिती प्रक्रिया, काळानुसार बदलेले राष्ट्रध्वजाचे स्वरूप हा इतिहास यातून उलगडा जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी संपूर्ण भारतातील राजे, राजवाडे, संस्थाने भारतात विलगिकरण कसे झाले त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची भुमिका अशी रोचक माहिती प्रदर्शनातुन समजेल. भारताला एकसंघ करून स्वतंत्र भारताचे मुख्य आधार म्हणजे संविधान हे संविधानाविषयीसुध्दा प्रदर्शनात माहिती घेता येईल.
शाळा, महाविद्यालयांसाठी अभ्यास सहल – महात्मा गांधी उद्यानातील प्रदर्शन सकाळी 7 ते 10 तर संध्याकाळी 5 ते 10 दरम्यान सर्वांनसाठी खुले असेल. तसेच शाळा, महाविद्यालयांना विशेष गृपसह प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. त्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी निलेश पाटील मो.9404955300; 02572264803 यांच्याशी संपर्क करावा,असे कळवले आहे. गांधी तिर्थ आज खुले – जैन हिल्स निसर्गरम्य परिसरातील ‘खोज गांधीजी की’ हे संग्रहालय पर्यटकांच्या मागणीस्तव उद्या, सोमवार 15 आॕगस्टला खुले असेल, पर्यटकांनी याचा आनंद घ्यावा, असे गांधी तिर्थ व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे.