जळगाव : राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेले पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर यांचा स्वातंत्र्य दिनी राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर सध्या जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. यावेळी व्यासपिठावर पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, आ. सुरेश भोळे आदी उपस्थित होते.
पोलिस उप निरीक्षक प्रदिप चांदेलकर यांच्यासह तालुका पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार विजय देवराम पाटील तसेच माणिक सपकाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुरेश पाटील व मोटार वाहन विभागाचे चालक प्रदिप चिरमाडे यांना देखील राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून त्यांचा देखील यावेळी मंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या सर्वांना मुंबईत राज्यपालांच्या हस्ते पदक प्रदान केले जाणार आहे.