पत्रकार आत्महत्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा

अकोला : अकोला येथील पत्रकार प्रभाकर विरघट यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्रकार प्रभाकर विरघट यांनी 10 ते 11 ऑगस्टच्या रात्री आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मृत्युपुर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाइट नोट नुसार एकुण आठ जणांविरुद्ध अकोट फाइल पोलिस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार प्रभाकर विरघट यांचा मुलगा प्रतुल घटनेच्या रात्री त्याच्या काकांकडे झोपण्यासाठी गेला असतांना ते घरी एकटेच होते. दरम्यानच्या कालावधीत विरघट यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दुस-या दिवशी सकाळी 11 वाजता शेजारी राहणारा त्यांचा दुसरा मुलगा अखिल त्यांना बघण्यासाठी आला असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

घटनास्थळावर पोलिसांना प्रभाकर विरघट यांच्या खिशात एकुण तीन चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यामध्ये शिवशक्ती प्रिंटिंग प्रेसच्या व्यवहारात सन 1988 मधे रमेश सरने, मोहन काजळे, मदन जोशी, प्रभाकर जोशी, कॉ. रमेश गायकवाड, रमेश जैन, प्रेम कनोजिया, मोतीलालजी कनोजिया यांनी फसगत आणि विश्वासघात केल्यामुळे आर्थिक अडचण आल्याचे म्हटले आहे.

आपल्याला गुन्हेगार केल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे पुढे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा प्रतुल याने दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि. 306, 34 नुसार आकोट फाईल पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा त्यांनी चिठ्ठीत व्यक्त केली आहे. प्रेस कामगार सुशीर वरघट रा. ख्रिश्चन कॉलनी याच्याकडून माहिती घ्यावी असे देखील चिठ्ठीत त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here