जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

जळगाव : धुळे तालुका पोलिस स्टेशनला जबरी चोरीच्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीस अटक करण्यात आली आहे. गोपाल गोपी रावळकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील पोलिस नाईक इमरान सैय्यद आणि पो.कॉ. गोविंदा पाटील या दोघांनी या कारवाईत सहभाग घेतला.

धुळे येथील रहिवासी पृथ्वीराज मनसाराम पाटील यांना तिघा अज्ञात इसमांनी अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोळाशे रुपये आणि मोबाईल जबरीने काढून घेतला होता. या घटनेप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात जळगावच्या कंजरवाड्यातील रहिवासी गोपाल गोपी रावळकर याचे नाव निष्पन्न झाले. गोपाल रावळकर याने पृथ्वीराज पाटील यांचा मोबाईल हिसकावला असल्याचे तपासात उघड झाले.

जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार पो.ना. इमरान सय्यद आणि पो.कॉ, गोविंदा पाटील या दोघांनी गोपाल यास कंजरवाडा परिसरातून ताब्यात घेत त्याच्याकडून मोबाईल हस्तगत केला. धुळे येथील साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे त्याने कबुल केले आहे. पाच ते सहा महिन्यानंतर सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. अटकेतील आरोपी गोपाल रावळकर यास धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here