घरगुती वस्तूंची तोडफोड व घरफोडी करणा-यास अटक

जळगाव : अनाधिकारे घरात प्रवेश करत घरातील संसारोपयोगी वस्तूंची नासधूस करत रोख दिड लाख रुपये घेवून पलायन करणा-या आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. शंकर प्रकाश कंजर रा. सुप्रिम कॉलनी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सुप्रिम कॉलनीत राहणा-या परवीन शाहरुख पटेल यांच्या घरात 14 ऑगस्टच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास शंकर कंजर याने अनाधिकारे प्रवेश केला होता. घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस, होम थियेटर, मिक्सर आदी वस्तूंची तोडफोड करत रोख दिड लाख रुपये ताब्यात घेत त्याने पलायन केले होते. घटना घडल्यापासून तो पसार होता. पोलिस पथक त्याच्या मागावर होते.

कंजरवाडा परिसरात शंकर आल्याची माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, दत्तात्रय बडगुजर, सुधीर साळवे, किशोर पाटील, इमरान सय्यद, सचिन पाटील आदींनी त्याला अटक केली. त्याला श्रीमती जे.एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here