3 कोटी रुपयांचे असली सोने बॅकेतून गायब

On: August 19, 2022 2:40 PM

अमरावती : अमरावती येथील युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत सोने तारण कर्ज योजनेतील 59 ग्राहकांचे सुमारे तिन कोटी रुपये किमतीचे असली सोने गायब झाले असल्याचे उघडकीस आले आहे. त्याजागी नकली सोने असल्याची बाब ऑडीट तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे.

एका ग्राहकाचे 100 ग्रॅम वजनाचे सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन हा प्रकार उघडकीस आला आहे. असे असले तरी अद्याप एकच तक्रारदार पोलिसांपुढे आला आहे. या ग्राहकाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार 59 खात्यातील 5 किलो 800 ग्रॅम वजनाच्या सोन्यात झोल झाला असून ते बनावट असल्याचे उघड झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment