प्रेमी युगल हत्याकांडात वकीलाविरुद्ध गुन्हा दाखल

On: August 20, 2022 11:03 AM

जळगाव : चोपडा येथे 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रेमी युगल हत्याकांड प्रकरणी स्थानिक वकीलाविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड. नितीन पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपी वकीलाचे नाव असून तो फरार आहे. या गुन्ह्यात संशयीत आरोपींची संख्या तेरा झाली आहे. यापैकी अकरा संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघे अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात असून वकीलाचा समावेश असलेले दोघे जण फरार आहेत.

अ‍ॅड. नितीन पाटील (रा. गरताड ता. चोपडा) व गावठी कट्टा पुरवणारा मध्य प्रदेशातील शेखर शिखलकर असे फरार असलेल्या दोघांची नावे असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत. अ‍ॅड पाटील व खुनातील आरोपी यांच्यात पुरावे नष्ट करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. हत्या झालेल्या मुलीच्या आईसह नऊ जणांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment