चाळीसगांवच्या नेताजी चौक गोविंदा पथकाचे सात थर

On: August 21, 2022 12:40 PM

जळगाव : नुकत्याच झालेल्या दहीहंडी महोत्सवात चाळीसगाव शहरातील नेताजी पालकर चौक गोविंदा पथकाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. या पथकाने चाळीसगाव शहरात आयोजित केलेल्या वीर सावरकर चौकातील राष्ट्रवादी पक्षाची दहीहंडी, दयानंद कॉर्नर येथील वंचित बहुजन आघाडी, संभाजी अप्पा मित्रपरिवार, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भारतीय जनता पार्टी व खासदार उन्मेश पाटील मित्र परिवार अशा सर्व ठिकाणी सात थर लावले. उत्तर महाराष्ट्रात सात थर लावणा-या या गोविंदा पथकाची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.

चाळीसगांव शहरवासीयांकडून नेताजी पालकर गोविंदा पथकाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले. गेल्या 1 महिन्यापासून नेताजी पालकर गोविंदा पथक दहीहंडीचा सराव करत होते. या गोविंदा पथकाला मुंबई येथील प्रशिक्षक दिपक वाघ यांचे प्रशिक्षण लाभले. सरावदरम्यान इजा होवून देखील पथकाने आपली जिद्द सोडली नव्हती. सर्वात वरच्या थरावर कीर्ती जाधव ह्या मुलीला गोविंदाचा मान देण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment