हमालाच्या ताब्यातील बारा हजाराची लुट

जळगाव : एकाच रात्री हमालासह व्यापा-याच्या ताब्यातील रक्कम लुटीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही घटना 20 ऑगस्टच्या रात्री काही वेळेच्या फरकाने घडल्या आहेत. एका घटनेत व्यापा-याच्या ताब्यातील अडीच लाख रुपयांची रोकड तर दुस-या घटनेत हमालाच्या ताब्यातील बारा हजार रुपयांची रक्कम मोटार सायकलस्वारांनी हिसकावून नेली आहे. दोन्ही घटनेत दोन मोटार सायकलवर आलेले तरुण असल्याचे साम्य आहे.

खेमराज भास्कर नारखेडे हे पन्नास वर्ष वयाचे गृहस्थ एमआयडीसी परिसरातील धुडकू सपकाळे यांच्या आडत दुकानावर हमालीकाम करतात. धुडकू सपकाळे यांच्या सांगण्यावरुन बारा हजाराची रक्कम ते सुप्रिम कॉलनी रिक्षा स्टॉपवर संबंधीतास देण्यास जात होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करत दोन मोटार सायकलवर एकुण चार जण आले. तिघांनी खेमराज नारखेडे यांना पकडून ठेवत चाकूचा धाक दाखवत बारा हजाराची रक्कम हिसकावून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here