पंकज नाले यांचा शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मान

On: August 22, 2022 7:05 PM

जळगाव : कोचिंग क्लास असोसिशन महाराष्ट्र या संस्थेतर्फे शिक्षक पंकज नाले यांचा “शिक्षक रत्न पुरस्कार 2022” देवून यथोचीत सन्मान करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कोचींग क्लास अधिवेशनाच्या समारंभात त्यांचा हा सन्मान झाला.

कोचिंग क्लास असोसिएशनचे पहिले राज्य अधिवेशन औरंगाबाद येथे 21ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाले. यावेळी पंकज नाले यांची कोचिंग क्लास असोसिशन महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड देखील करण्यात आली. तसेच त्यांना सीसीए राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले. याप्रसंगी औरंगाबादच्या एमजीएम विद्यापीठाचे प्राध्यापक, कोचिंग क्लासचे राजाध्यक्ष पी. एम. वाघ तसेच सर्व कोचिंग क्लासेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment