जळगाव : जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालयानजीक असलेल्या निवृत्ती नगरात मंगळवारी मध्यरात्री तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. एका पाठोपाठ जळगाव शहरात समोर येत असलेल्या खूनाच्या घटना एक चिंतेचा विषय झाला आहे.
भावेश उत्तम पाटील असे हत्या झालेल्या आव्हाणे येथील मुळ रहिवासी असलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर एक मोटार सायकल आणि भावेश याची हत्या वाळू व्यवसायातून झाली असल्याचे बोलले जात असले तरी खरे कारण पोलिस तपासातच स्पष्ट होणार आहे. मयत तरुण हा वाळू व्यावसायाशी संबंधीत होता. वाळूच्या व्यवसायातून कमाई भरपूर आणि डोकेदुखी देखील तेवढ्याच प्रमाणात असल्याचे म्हटले जाते. अद्याप या खूनाचे कारण अस्पष्ट असून पोलिस तपास सुरु आहे. मयत भावेश हा जळगाव शहरातील निवृत्ती नगरात परिवारासह रहात होता. त्याचे वडील आव्हाणे येथे तर भाऊ सुरत येथे राहतो.