वाळू व्यावसायिकाची निर्घृण हत्या घरात घुसून चाकूचे सपासप वार

On: August 9, 2020 9:58 PM

अमरावती : अमरावती जिल्हयाच्या तिवसा येथे आज दुपारी साडे तीन वाजता एक थरारक घटना घडली.  अज्ञात चौघा मारेकऱ्यांनी घरात अनाधिकारे प्रवेश करत आई-वडील व बहिणीसमोर तरुणाची चाकूने वार करत हत्या केली.  

अमरावती जिल्ह्याच्या तिवसा येथील आंबेडकर चौकात दुपारी साडे तीनच्या सुमारास हा खुनाचा प्रकार घडला. या घटनेनंतर मारेकरी पसार होण्यात यशस्वी झाले. घटनेनंतर परिसरात सर्वांचा थरकाप उडाला. अजय बाबाराव दलाल (25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरु केली. फरार झालेल्या मारेक-यांचा तपास सुरु आहे. 

खून झालेल्या अजय दलाल हा वाळू व्यावसायीक होता. त्याचे शहरात बेकायदा व्यवसाय देखील सुरु होते. आज सुटीचा दिवस असल्यामुळे अजय घरी असल्याची संधी साधून मारेकरी आले व त्यांनी अजयचा खून केला. खून झाला त्यावेळी घरात त्याचे आई वडील व बहिण हजरच होते. त्यांच्यासमोरच हा थरार झाला. हातातील पिस्तुलच्या धाकावर इतरांना मधे येण्यास मज्जाव करत हल्लेखोर आरोपी पसार झाले. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment