लहान भावाच्या “त्या” मागणीने संतापलेल्या भावाने केली त्याची हत्या?

On: August 27, 2022 10:03 AM

जळगाव : पोळ्याच्या दिवशी दोघा भावांमधे झालेल्या वादाचे पर्यावसन हत्येत झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील अभोणे येथे उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी तुकाराम पाटील (32) रा. अभोणे असे हत्या झालेल्या मयत भावाचे तर सुरेश तुकाराम पाटील (38) असे संशयीत आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे.

मद्याच्या नशेत लहान भाऊ शिवाजी याने मोठा भाऊ सुरेश याच्याकडे एक संतापजनक विचीत्र मागणी केल्याचे म्हटले जात आहे. ती मागणी ऐकून सुरेशच्या संतापाचा पारा चढला. संतापाच्या भरात सुरेशने शेतात वापरल्या जाणा-या लोखंडी वस्तूने त्याला सलग तिन ते चार वेळा मारहाण केली. या मारहाणीत शिवाजीचा मृत्यू झाला. शिवाजी यास डॉक्टरांनी मयत घोषित केले. पोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने अभोणे गावात शोककळा पसरली आहे. मेहुणबारे पोलिस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment