जळगाव : धरणगाव तालुक्यातील चिंचपुर गावानजीक असलेल्या एका शेत शिवारातील विहीरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधान आले आहे. सदर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून हा अपघात आहे की घातपात हे अद्याप पुढे आलेले नाही.
आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या मृतदेहाची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत गर्दी केली. सदर घटनेची माहिती धरणगाव पोलिसांना मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली. तपासात हा प्रकार अपघात आहे की घातपात हे समजणार आहे.