जळगाव : मुक्ताईनगर या तालुक्याच्या ठिकाणी मुक्ताईनगर – बुरहानपूर मार्गावर असलेल्या साखर कारखान्याच्या पुढे एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. आज सकाळीच महिलेची निर्घृण हत्या केल्यानंतर अज्ञात महिलेचा मृतदेह प्लॅस्टीक कॅरीबॅग मधे आढळून आल्याने मुक्ताईनगर तालुक्यात या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चेला उधान आले आहे.
सदर अज्ञात मयत महिलेचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह साधारण 45 वर्ष वयोगटातील आहे. मुक्ताईनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला वेग दिला.