मुक्ताईनगर येथील खूनाचा झाला उलगडा

जळगाव : मुक्ताईनगर येथे गेल्या 29 ऑगस्ट रोजी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेत आढळून आलेल्या अज्ञात महिलेचा खून झाल्याचे दिसून आले होते. सदर घटनेतील मयत महिलेची ओळख पटली असून दोघे संशयीत आरोपी देखील निष्पन्न करण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. प्रभा माधवराव फाळके असे मलकापूर येथील मयत महिलेचे नाव निष्पन्न झाले आहे. विश्वास भास्करराव गाढे आणि भार्गव विश्वास गाढे अशी दोघा संशयीतांची नावे आहेत.

दोघा संशयीतांचे मोबाईल सीडीआर आणि लोकेशन तसेच मलकापुर शहरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणीत दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले आहे. मलकापूर शहरातील प्रभा फाळके या मयत महिलेचा मुलगा रितेश माधवराव फाळके यास मयत महिलेचे फोटो दाखवले असता ती आपली आई असल्याचे त्याने ओळखले. मुक्ताईनगर पोलिसांनी त्याची अधिक विचारपुस केली असता फोटोतील महिलेच्या अंगावरील काही दागिने नसल्याची बाब उघड झाली आहे. तिच्या अंगावरील चैन पट्टी, अंगठी, चप्पल बघून ती आपली आई प्रभा फाळके असल्याचे त्याने सांगितले.
मयत प्रभा माधवराव फाळके हिच्या शेजारी राहणारे विश्वास भास्करराव गाठे यांचे तिच्या घरी नेहमी येणे जाणे होते. विश्वास गाढे आणि भार्गव विश्वास गाढे असे दोघे तिच्या संपर्कात असल्याचे तपासात दिसून आले आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोहेकॉ गणेश मनुरे, पोना संतोष नागरे, पोना नितीन चौधरी, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोना लतीफ तडवी, पोना देवसिंग तायडे, पोना कांतिलाल केदारे आदींनी घटनास्थळी जावून तपासकामाला सुरुवात केली होती. अधिक तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here