माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी रुग्णालयात दाखल ; कोरोना पॉझिटीव्ह असल्याबाबत केले ट्विट

दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रुग्णालयात आपण तपासणीसाठी गेलो होते. त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आपणास समजले. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी आवाहन आहे की, गेल्या आठवड्याभरात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

माजी राष्ट्र्पती प्रणव मुखर्जी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर जनतेने त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ट्विट करून प्रणव मुखर्जी यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीदेखील ट्विट करत त्यांना बरे व्हा, अशी प्रार्थना केली आहे. प्रणव मुखर्जी यांचे वय आज 84 वर्षे आहे, त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी हे सन 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते. सन 2019 मध्ये केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न देत त्यांचा सन्मान केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here