जळगाव : महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था “यशदा” तर्फे आयोजीत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत “उत्कृष्ठ उपक्रम आणि यशोगाथा” या उपक्रमात सहभागी होणा-या दीपककुमार गुप्ता यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला आहे. दीपककुमार गुप्ता हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून नावारुपाला आले आहेत.
प्रशस्तीपत्र आणि एक हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देखील राज्यपालांच्या हस्ते पोलिसांना दिला जाणारा राष्ट्रपती पदकाचा कार्यक्रम रखडला होता. आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला गती मिळाली होती. यासह गुप्ता यांचे अनेक उपक्रम विचारात घेत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.