संपत्तीच्या वादातून महिलेची हत्या ; ११ जण पोलिसांच्या ताब्यात

काल्पनिक छायाचित्र

जालना : संपत्तीच्या वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी ११ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना शहराच्या काझीपुरा भागात मध्यरात्रीच्या या घटनेप्रकरणी अकरा जणांना अटक करण्यात आली आहे.

हिना सय्यद माजीद (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हिना सय्यद माजीद व तिचा पती सय्यद माजीद सय्यद कय्यूम हे रात्रीच्या वेळी घरीच होते. त्यावेळी अचानक घरी आलेल्या अरबाज खान जाफर खान, निलोफर जाफर खान, नसीमाबी जाफर, हलिमाबी धूमअली शहा, नसीमाबी शेख वहाब, शहाबाज जाफर खान, शेख अजगर शेख अब्दुल वहाब, शबाना धुमअली शहा, अकबर धुमअली शहा, नफीसा अलताफ खान, इस्माईल उर्फ शक्ती अहेमद शहा यांनी घरात अनाधिकारे येत हिना सय्यद या विवाहितेस लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. काही वेळातच गंभीर जखमी हिना सय्यद या विवाहितेचा मृत्यू झाला.

या मारहाणीत विवाहितेचा पती सय्यद माजीद सय्यद कय्युम याला देखील मारहाण करण्यात आली. जखमी सय्यद माजीद याने दिलेल्या फिर्यादीनुसार अकरा जणांविरुद्ध सदर बाजार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय देशमुख, स.पो.नि. रुपेकर आदींच्या मदतीने अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. नागवे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here