पैठण कारागृहातील रजेवरील फरार बंद्यास अटक

जळगाव : कोविड कालावधीत आकस्मिक अभिवचन रजेवर बाहेर सोडण्यात आलेला व नंतर फरार झालेल्या कैदी बंद्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शेख इसा शेख पिरन (40), रा. शिवाजी नगर जळगाव असे अटक करण्यात आलेल्या बंदी केद्याचे नाव आहे. खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या शेख इसा शेख पिरन हा पैठण जिल्हा मध्यवर्ती खुले कारागृह बंदी आहे.

शेख इसा शेख पिरन यास कोविड कालावधीत आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. या कालावधीत त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनला नियमीत हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याने जळगाव शहर पोलिस स्टेशनला नियमीत हजेरी लावली नाही अथवा ठरलेल्या तारखेला पैठण कारागृहात हजर देखील झाला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला भा.द.वि. 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार शिक्षा बंदी कैदी शेख इसा शेख पिरन हा आपली ओळख लपवून जळगावच्या शिवाजी नगर परिसरात ट्रान्सपोर्ट नगर येथे गाड्यांवर काम करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील हे.कॉ. जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पो.ना. नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे, विजय पाटील आदींच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here