अमळनेरला विवाहितेची हत्या – संशयीत पतीस अटक

On: September 9, 2022 9:05 AM

जळगाव : चारित्र्याच्या संशयातून विवाहितेची गळा दाबून हत्या केल्याची घटना अमळनेर येथे उघडकीस आली आहे. 8 सप्टेबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटने प्रकरणी संशयीत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पतीला अटक करण्यात आली आहे. योगिता देविदास चौधरी (35) रा. मुंबई गल्ली अमळनेर असे मयत विवाहितेचे तर देविदास चौधरी असे संशयीत आरोपी पतीचे नाव आहे.

सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा भास निर्माण करणारे चित्र निर्माण करण्यात आले होते असे म्हटले जात आहे. मयत योगिता चौधरी सुरत येथे काही दिवसांपुर्वी मामाच्या गावी गेली होती असे समजते. दरम्यानच्या कालावधीत पतीने तिची बदनामी सुरु केल्याचे समजल्याने ती पुन्हा अमळनेर येथे परतली होती अशी चर्चा आहे. या प्रकरणी उशिरा रात्री मयत विवाहितेचा पती देविदास चौधरी यास अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उप निरीक्षक अनिल भुसारे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment