जळगाव महापौरांच्या घरावर फेकला गुलाल आणि फटाके?

जळगाव : जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांच्या मेहरुण परिसरातील निवासस्थानी गणपती विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांकडून गुलाल व फटाके फेकल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 सप्टेबरच्या रात्री अकरा वाजता झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील वातावरण काही वेळ तणावपुर्ण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. पोलिसांचे परिस्थितीवर योग्य ते नियंत्रण असून अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुर्वेश यशवंत महाजन याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम मित्र मंडळाची मिरवणूक महापौरांच्या घरासमोरुन जात असतांना हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपल्या घरात वृद्ध रुग्ण असून मिरवणूक पुढे नेण्यास पुर्वेश महाजन याने मंडळ कार्यकर्त्यांना सांगितले. मंडळ कार्यकर्त्यांना राग आला व त्यांनी घरावर गुलाल व फटाके घरावर फेकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी योगेश नाईक, तेजस वाघ, अजय सांगळे, मयुर सांगळे, दिनेश घुगे, किरण नाईक यांच्यासह इतर अठरा कार्यकर्ते अशा सर्वांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here