चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावी हिंदू मुस्लीम ऐक्याचे दर्शन

On: September 10, 2022 1:56 PM


जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या गावी गणपती विसर्जन मिरवणूकीदरम्यान हिंदु मुस्लीम ऐक्यासह जातीय सलोख्याचे दर्शन दिसून आले आहे. गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान मुस्लीम बांधवांनी हिरीरीने भाग घेत नाचत गाजत गणपती बाप्पाला निरोप दिला.

स्वत: मुस्लिम बांधवांनी गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत नृत्य केल्याने उत्साहाला उधान आल्याचे चित्र गणेश विसर्जन मिरवणूकीत दिसून आले. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या सहका-यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. शांततेत मिरवणूका पार पाडण्याकामी सहकार्य केल्याबद्दल सर्व गणेश भक्त गावक-यांसह गणेश मंंडळांचे चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे व त्यांच्या सहका-यांनी आभार व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment