महापौरांच्या घरावर हल्ला प्रकरणी तिघे ताब्यात

जळगाव : जळगावचे महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगेश राजेंद्र नाईक, भरत चांगदेव आंधळे आणि सागर विजय लाड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

जळगावच्या विद्यमान महापौर जयश्री महाजन या मेहरुण परिसरात राहतात. त्यांच्या घरासमोर 9 सप्टेबरच्या रात्री गणेश विसर्जन करण्यासाठी जाणा-या काही कार्यकर्त्यांनी गुलाल फेकून फटाके फोडून जल्लोष केला होता. या घटनेत दगडफेकीचा देखील प्रकार झाला असल्याचे पुर्वेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी एकगाव एक गणपती व श्रीराम मित्र मंडळातील कार्यकर्ते योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्वर वाघ, अजय संतोष सांगळे, मयुर बाळकृष्ण सांगळे, दिनेश शिवदास घुगे, किरण जगदीश नाईक, तेजस सुनिल घुगे, महेश शिवदास घुगे, दिपक राजेंद्र नाईक, राहुल सानप, वैभव किशोर वाघ (मेघा किराणा), महेश ऊर्फ माही लाड, रामा वासुदेव सानप, मंगेश राजेंद्र नाईक, भावेश उमेश घुगे, भरत चांगदेव आंधळे, किरण शेले, सागर विजय लाड व इतर 25 ते 30 जण अशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अ‍ॅड. निता भरत महाजन यांच्या गळयातील तिन तोळे वजनाची सोन्याची पोत गहाळ झाली असल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच राजेंद्र नाईक व तेजस नाईक यांनी हातात चाकु घेवुन उपस्थितांवर चाकू मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here