डॉ. व्ही. आर. कुलकर्णी यांचे निधन

On: September 11, 2022 8:03 PM

जळगाव : धरणगाव येथील प्रतिथयश, नामांकित फॅमिली डॉक्टर व्ही. आर. कुलकर्णी यांचे वृध्दापकाळाने ठाणे येथे निधन झाले. डॉ. कुलकर्णी यांंच्या पश्चात पत्नी, ठाणे येथील विवेक व अतुल कुलकर्णी ही दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ओरियन शाळेतील शिक्षिका धनश्री नांदेडकर यांचे ते वडील तर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी चंद्रवदन नांदेडकर यांचे सासरे होत. डॉ. कुलकर्णी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन परिवार चंद्रवदन नांदेडकर यांच्या दुख़ा:त सहभागी आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 89 वर्ष होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment