जळगाव एलसीबीची धुरा किसनराव नजनपाटील यांच्याकडे

जळगाव : पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन झाल्यानंतर अनेक वेगवान घडामोडी सुरु झाल्या आहेत. यापैकी महत्वाची घडामोड म्हणजे आता एलसीबीची धुरा पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याकडे आली आहे. आजच्या घडीला जळगाव जिल्ह्यातील जुने, माहितगार आणि सक्षम अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याकडे पाहिले जाते.

पाचोरा पोलिस स्टेशनसह एलसीबीचा कारभार बघण्याची दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. असे असले तरी डीवायएसपी म्हणून प्रमोशनच्या यादीत देखील त्यांचे नाव आहे. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्याकडे एलसीबीची स्थायी स्वरुपात जबाबदारी निश्चीत असल्याचे समजून पाचोरा पोलिस स्टेशन मिळवण्यासाठी अनेक पोलिस अधिकारी आतापासूनच फिल्डींग लावून सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.

पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील हे शिस्तप्रिय अधिकारी असून त्यांनी जळगाव शहर, भुसावळ बाजारपेठ, चोपडा शहर, पाचोरा असा जळगाव जिल्ह्यातील पोलिस सेवेचा प्रवास केला आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनला कार्यरत असतांना नेतागिरी करणा-या एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-याला त्यांनी पोलिसी खाक्या दाखवून त्याची जागा दाखवून दिल्याचे उदाहरण आहे. चोपडा शहर पोलिस स्टेशनला कार्यरत असतांना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत झालेला त्यांचा वाद गाजला होता. त्यावेळी चोपडा शहरातील नागरिकांनी त्यांंची बदली रद्द करण्यासाठी आंदोलन केल्याचे देखील उदाहरण आहे. जशास तसे, ठोशास ठोसा असा स्वभाव असलेले पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्याकडे एलसीबीची जबाबदारी आल्याने अनेकांना आनंंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here