जळगांव : नागपुर येथे दि २ ते ४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान होणाऱ्या १३ वर्ष वयोगटातील मुले व मुली राज्य निवड बुध्दिबळ स्पर्धेत आयोजन केले आहे तसेच ११ वर्षाआतील राज्य स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहेत. राज्य स्पर्धेसाठी AICF चे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हा बुध्दिबळ संघटनेतर्फे जिल्हा निवड चाचणीचे आयोजन उद्या रविवार दि १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ,जिल्हा पेठ जळगांव येथे खेळाडुची बुध्दिबळ निवड चाचणी ठेवली असुन यामध्ये ११ व १३ वर्ष वयोगटात प्रथम २ मुले व २ मुली यांची निवड करून त्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय नागपूर व रत्नागिरी येथे होणाऱ्या बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
३ ते ५ क्रमांकाच्या खेळाडूंना मुले व मुली गटात मेडल देउन गौरविण्यात येईल. या स्पर्धेत बक्षीस स्वरूपात राज्य स्पर्धेची प्रवेश फी व चषक देण्यात येईल. या स्पर्धेत फक्त जळगांव जिल्हातील खेळाडु खेळू शकतात. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी खेळाडूंनी प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन जळगांव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादीया व पदाधिकारी यांनी केले आहे.